- विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
महाराष्ट्र शासनाने कोरोना या महामारीचे गांभीर्य लक्षात घेवून महाराष्ट्र राज्यभर ०१ जुन ते १५ जुन या कालावधी करीता लॉकडाऊन जाहीर केलेला आहे व कोरोनाचा अतिप्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांकरीता लॉकडाऊन काळात सर्व प्रकारची दुकाने अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्तची सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना बहाल केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव संपुर्ण नियंत्रणात आला असून मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले आहे. तसेच रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. लॉकडाऊन मुळे न्हावी, शिंपी, चांभार, कुंभार, हातगाडी वाले, छोटे व्यापारी, इलेक्ट्रॉनिक्स, कपड्याचे व हार्डवेअर दुकानदार तसेच बांधकाम मजुर फारच आर्थिक संकटात आलेले आहेत. व्यापक जनहित लक्षात घेता व वर उल्लेखीत घटकांचे दैनंदिन जीवनाचे उत्पन्नाचे साधन विचारात घेता व त्यांना जीवन जगणे सुसह्य व्हावे, यादृष्टीने नाशिक जिल्ह्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हाभर आवश्यक सेवा व्यतिरिक्तची सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळात सुरु ठेवणे आवश्यक व न्यायोचित आहे आणि त्याकरीता तशा आशयाचे आदेश निर्गमीत करणे आवश्यक आहे, ही बाब समितीने आग्रह पूर्वक मांडली आहे. गेल्या दोन दिवसापासुन अनेक व्यापारी, छोटे व्यावसायिक यांनी समितीचे नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप यांना भेटून याविषयी आपली परिस्थिती सांगून दुकाने उघडण्याची मागणी केली होती.
आज विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किशोर दहेकर, विभागीय सचिव मितीन भागवत, अनिल दिकोंडवार, ईश्वर सहारे, सुदाम राठोड, आनंद अंगलवार, योगेश मुरेकर ईत्यादी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना भेटून मागणीचे निवेदन दिले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.