Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे यांच्या वाढदिवसाप्रसंगी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भुरकुंडा (बु.), सुकूडपल्ली आणि साखरवाही येथील गरजू कुटुंबांना दिला आधार अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - छत्रपती शिवाजी ...

  • भुरकुंडा (बु.), सुकूडपल्ली आणि साखरवाही येथील गरजू कुटुंबांना दिला आधार

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
छत्रपती शिवाजी महाराज याना आदर्श मानणाऱ्या शिवसेना पक्षाकडून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हि बाळा साहेबांची शिकवण या तत्वानुसार शिवसैनिक समाजसेवेचे व्रत अंगीकारत समाजसेवा करीत असतात. त्याच अनुषंगाने राजुरा तालुक्यातील शिवसेनेचे कर्तव्यनिष्ठ, सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे नेते म्हणून ओळखल्या जाणारे शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबनराव उरकुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसानिमित्य तालुक्यातील पाचगाव-आर्वी क्षेत्रातील भुरकुंडा, सुकूडपल्ली आणि साखरवाही येथे गरजू लोकांना धान्यकीट, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेले बबन उरकुडे यांनी या प्रसंगातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कोणताही उडाव खर्च न करता त्याच पैश्यांचा बदल्यात केलेले हे कार्य उल्लेखनीय आहे.

स्वतःच्या नेतृत्वला अश्या उपक्रमातून आणि शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदवाक्याला समर्पक अशे काम करून त्यांनी नेहमीच स्वतःला सिद्ध केले असून स्वतःच्या कार्यातून तालुक्यात नाव लौकिक कमवताना हे नेतृत्व पुन्हा पुन्हा उभारतांना दिसत आहे. कोरोना काळात तालुक्यातील जनतेची कोणतीही समस्या असली तरी 24 तास काम, लोकांचे फोन उचलून त्यांच्या समस्या सोडवणे अश्याप्रकारे जनतेची नाळ जोडून ठेवणारे नेते म्हणून तालुक्यात त्यांचे नाव लौकिक होत आहे. याप्रसंगी शिवसेनेचे नेते राजेंद्र डोहे, निलेश गंपावार, रमेश झाडे, बंटी मालेकर, बालुभाऊ कुंटे, मनोज कुरवटकर, प्रवीण मोरे, गणेश चोथले, सूर्यवंशी, समिर शेख आणि पदाधिकारी उपस्थित होते.  





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top