Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्रेकिंग न्यूज - दालमिया सिमेंट कंपनीत कंत्राटी कामगाराचा ऊंचीवरून पडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - गडचांदूर - सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत उंचीवर काम करीत असल...

धनराजसिंह शेखावत -
गडचांदूर -
सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत उंचीवर काम करीत असलेल्या एका कंत्राटी कामगाराचा ऊंचीवरून पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. मृतक कामगाराचे नाव संतोष चव्हाण वय 28 रा. नांदा फाटा आहे असे सांगितले जात आहे.

नारंडा येथील दालमिया सिमेंट प्लांट मधे आज दुपारी उंचीवर संतोष चव्हाण नामक कंत्राटी कामगार काम करीत होता. तो अचानक खाली पडल्याने त्याला तात्काळ गडचांदूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. गडचांदूर येथील दवाखान्यात आणताच क्षणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दालमिया सिमेंट कंपनीतील सर्व युनियनचे पदाधिकारी पोहोचले असून सोबतच दालमिया कंपनीचे व्यवस्थापन कमीटी सुद्धा रुग्णालयात हजर असल्याची माहिती आहे. मृतकाचा कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत स्थायी नौकरी व आर्थिक साहाय्य देण्याची मागणी कामगार संघटनेनी केली आहे. बातमी लिहीपर्यंत मृतक नेमके कुठून, किती उंचीवरून पडला हे मात्र कळू शकले नाही. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top