- सेवा दिवसाच्या निमित्याने खामोन्यात फेसमास्क चे वितरण
- जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांचा पुढाकार
याचदरम्यान उपस्थित नागरिकांना महिला स्वयंसहाय्यता गटाचा आढावा घेत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी ग्रामीण भागात कशा निर्माण होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे म्हटले कि, ग्रामीण भागात सुध्दा उद्योगाच्या, व्यवसायाच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण, आपण कधी त्यांच्यांकडे संधी म्हणून बघितलेलेच नाही. त्यासंधी आपण खरोखर हेरल्या, तर वैयक्तिक विकासाबरोबर संपूर्ण गावाचा व गावाबरोबर परिसराचा विकास करण्याची ताकद आपण निर्माण करू शकू.
मौजा खामोना येथे महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या ग्रामसंघासाठी इमारतीची मागणी महिलांनी केली असता त्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करणार असल्याचे सभापती उरकुडे यांनी सांगितले. याप्रसंगी उपसरपंच सौ. शारदा तलांडे, ग्रापं सदस्य मारोती चन्ने, सौ अलका वैद्य, सौ. लक्ष्मी लोणारे, ग्रामसेवक मिलिंद देवगडे, आशा वर्कर सौ. सविता उरकुडे, सीआरपी श्रीमती जयश्री पावडे, प्रतिष्ठित नागरिक रामदास गिरसावळे, बाबुराव चन्ने, तुळशीराम तलांडे, दिलीप गिरसावळे तसेच मोठ्या संख्येने महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या महिला तसेच गावातील इतर नागरिक तथा युवकवर्ग आवर्जून उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.