Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सार्वजनिक वितरण व्यवस्था आधार सिडींग मध्ये राजुरा पुरवठा विभाग राज्यात अव्वल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सार्वजनिक वितरण व्यवस्था आधार सिडींग मध्ये राजुरा पुरवठा विभाग राज्यात अव्वल तर सावली तालुका दुसऱ्या क्रमांकावर अविनाश रामटेके - आमचा विदर्भ...

  • सार्वजनिक वितरण व्यवस्था
  • आधार सिडींग मध्ये राजुरा पुरवठा विभाग राज्यात अव्वल
  • तर सावली तालुका दुसऱ्या क्रमांकावर
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा (विरूर स्टेशन) -
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे दि. ३१ जानेवारी २०२१ पूर्वी मोबाईल क्रमांक व आधार सिडींग १०० टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना होत्या. प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्टाने चंद्रपूर जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर परिमंडळात मोहीम राबविण्यात आली. रेशनकार्डला आधार लिंक करावे असे आवाहन अन्नधान्य वितरण विभागाने केले होते. प्रशासनाच्या सूचनेला योग्य प्रतिसाद देत आधार सिडींग मध्ये राजुरा पुरवठा विभागाने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम तर सावली तालुक्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय योजनेच्या 9469 कार्ड चे 33828 युनिट, प्राधान्य कुटुंब लाभार्थी कार्ड संख्या 14922 चे 57444 युनिट असे एकूण कार्ड 24391, एकूण युनिट 91272 आधार सिडींग करण्यात आले. पण बातमी लिहेपर्यंत सावली तालुक्यातील आकडे कळू शकले नाही. 

प्रत्येक रेशनकार्ड आधारशी सिड व्हावे यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी साहेब, तालुका पुरवठा निरीक्षन अधिकारी सविता गंभीरे, पुरवठा निरीक्षक विकास राजपूत, नरेंद्र खांडेकर, कनिष्ठ लिपिक, गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले. आधार सिडींग मध्ये राज्यात अव्वल क्रमांक मिळाल्याबद्दल तहसीलदार हरीश गाडे साहेब, तहसील कार्यालयात सर्वांनी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top