- आरोपी अटकेत
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्गूस -
घुग्गूस येथील शांतीनगर वसाहतीत राहणाऱ्या एका साठ वर्षीय म्हातारीवर बावीस वर्षाच्या युवकाने अत्याचार केल्याची घटना आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद यासिन नूर वय 22 वर्ष असे असून हा चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात भावजी कडे एक महिन्या पासून राहत होता. व तो पंधरा दिवसापासून शांतीनगर येथील मदरसा मध्ये विद्यार्थ्याना उर्दू शिकविण्यासाठी जात असल्याचे सांगितले जाते. तसेच त्याला पॉर्न व्हिडीओ बघण्याची सवय असल्यामुळे तो घटनेच्या दिवशी पॉर्न बघून शांतीनगर येथे पहाटे 4.30 वाजता दरम्यान गेला मदरसा येथे नमाज पडून बाहेर आला. व एक महिला शौचास जात असल्याचे दिसले त्यांनी त्या महिलेचा हात पकडून खाली पाडले व बलात्कार केला याची बातमी परिसरात पसरताच पोलीस स्टेशन गाठून महिलेनी तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिली असता पोलीस अधीक्षक,एसडिपीओ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आरोपी विरुद्ध कलम 376,506 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मेघा गोखरे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.