Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त 24 तासात 529 पॉजिटीव्ह, 993 कोरोनामुक्त, 20 मृत्यु रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ...

  • आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त
  • 24 तासात 529 पॉजिटीव्ह, 993 कोरोनामुक्त, 20 मृत्यु
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ (नेर) -
दि. 15 : गत पंधरवाड्यात 83 टक्क्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) आता 90 टक्क्यांच्या वर गेला आहे. चालू आठवड्यात सतत सहाव्या दिवशीसुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यासाठी हे नक्कीच दिलासादायक चित्र असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सामुहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 60496 जणांनी कोरोनावर मात केली असून बरे होण्याचे प्रमाण 90.28 टक्के आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 464 ने जास्त आहे. जिल्ह्यात 529 जण पॉझेटिव्ह तर 993 जण कोरोनामुक्त झाले असून 20 जणांचा मृत्यु झाला. दोन मृत्यु जिल्ह्याबाहेरील (नांदेड आणि वाशिम) आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 12 मृत्यु, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खाजगी रुग्णालयातील सहा मृत्यु आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6416 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 529 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5887 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4903 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2280 तर गृह विलगीकरणात 2623 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 67004 झाली आहे. 24 तासात 993 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 60496 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1605 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.80 , मृत्युदर 2.40 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 65 वर्षीय महिला, घाटंजी येथील 60 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 59 वर्षीय पुरुष, वणी येथील 27 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 48 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये वाशिम येथील 60 वर्षीय महिला आणि दारव्हा येथील 69 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 23 वर्षीय महिला, दिग्रस येथील 60 वर्षीय महिला, वणी येथील 70 वर्षीय पुरुष व 71 वर्षीय महिला, पुसद येथील 47 वर्षीय पुरुष आणि किनवट (जि. नांदेड) येथील 73 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 529 जणांमध्ये 324 पुरुष आणि 205 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 83 पॉझेटिव्ह रुग्ण, बाभुळगाव 57, यवतमाळ 52, आर्णि 51, दारव्हा 45, घाटंजी 38, पुसद 31, राळेगाव 31, झरीजामणी 31, कळंब 27, वणी 26, दिग्रस 22, महागाव 19, उमरखेड 10, नेर 4, मारेगाव 1  आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे. 

सुरवातीपासून आतापर्यंत 523559 नमुने पाठविले असून यापैकी 521209 प्राप्त तर 2350 अप्राप्त आहेत. तसेच 454205 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 989 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 989 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 400 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 177 बेड शिल्लक, दहा डीसीएचसीमध्ये एकूण 516 बेडपैकी 167 रुग्णांसाठी उपयोगात, 349 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 636 उपयोगात तर 463 बेड शिल्लक आहेत. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top