- परस्परांच्या सहकार्याने कोरोना विरोधातील हा लढा निश्चीतपणे जिंकू - आ. सुधीर मुनगंटीवार
- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले श्री. लकी सलुजा यांचे आभार
दिनांक १५ मे रोजी भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शाखेला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रूग्णवाहीकेची चावी सुपुर्द करत आणखी एक रूग्णवाहीका नागरिकांच्या सेवेत रूजु केली. यावेळी बल्लारपूरचे नगरध्यक्ष हरीश शर्मा, काशी सिंह, निलेश खरबडे, समीर केने, अजय दुबे, मनीष पांडे, राजू दारी, सतिश कनकम, सारिका कनकम, राजेश दासरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच राजू अली हसन अली, प्रशांत कोलप्याकवार, विवेक ताटीवार, अशोक हासानी, श्री. सोनी यांची देखील उपस्थिती होती. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरकर जनतेच्या वतीने श्री. लकी सलुजा यांचे आभार व्यक्त केले.
कालच चंद्रपूर शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी आर्य वैश्य स्नेह मंडळाला आपण रूग्णवाहीका सुपुर्द केल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले. तीन दिवसा आधीच बल्लारपूरसाठी आमदार निधीतुन आपण दोन रूग्णवाहीका उपलब्ध केल्याचे ते म्हणाले. रूग्णसेवा ही सर्वांची प्राथमिकता असली पाहीजे असेही ते म्हणाले.
याआधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला १५ एनआयव्ही, २ मिनी व्हेटीलेटर्स, १५ मोठे व्हेटीलेटर्स, चंद्रपूर, मुल, बल्लारपूर, पोंभुर्णा साठी ३० ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध केले. त्यांच्या आमदार निधीतुन बल्लारपूर नगर परिषदेला २ रूग्णवाहीका उपलब्ध केल्या. १०० पीपीई किट, ७० चश्मे वितरीत केले. बल्लारपूर शहरातील २०० भाजीपाला विक्रेत्यांना फेसशिल्डसह जीवनावश्यक वस्तुंच्या किट्स वितरीत केल्या. कोविड काळात रूग्णांना ने-आण करण्यासाठी ५ रूग्णवाहीकांची सेवा निःशुल्क सुरू केली. १५० च्या वर ऑटोमेटीक सॅनिटायझर मशीनचे वितरण केले. नुकतेच या मशीनसाठी सॅनिटायझर सुध्दा वितरीत केले. मास्क व फेसशिल्डचे वितरण केले. आता चंद्रपूर महानगराला १५ व तालुक्याच्या ग्रामीण भागाला ५ असे २० ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर त्यांनी वितरीत केले.
यावेळी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी आ. सुधीर मुनगंटीवार आणि श्री. लकी सलुजा यांचे आभार मानले. कोरोनाच्या या लढाईत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सेवाकार्य यापुढेही असेच सुरू राहील, असेही हरीश शर्मा म्हणाले.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.