Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सावली तालुक्यातील गावातील ग्रामपंचायत सचिवाचा हेकेखोर पणा उजेडात.....
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - सावली तालुक्यातील ग्रामपंचायत कापसी अंतर्गत दोन वर्षा पासून 2019/20/21 चे घरकुल पंतप्रधान आवास योजना,...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -

सावली तालुक्यातील ग्रामपंचायत कापसी अंतर्गत दोन वर्षा पासून 2019/20/21 चे घरकुल पंतप्रधान आवास योजना, रमाई योजना अंतर्गत अनेक कामे सुरु आहेत. बेघर असलेल्यांना निवाऱ्याची व्यवस्था व्हावी म्हणून विविध शासकीय योजना राबवून घरकुल देण्यात येत असून ग्रामपंचायत कापशी येथे ही घरकुल काम सुरु आहेत. मात्र ग्रामपंचायत सचिव यांनी तब्बल घरकुल धारक लाभार्थ्यांचे झालेल्या कामाचे देयक प्रमाणपत्र मागण्यासाठी जाणाऱ्या लाभार्थी कडून प्रत्येक बिलाचे प्रमाणपत्र देताना 2000 रुपये मागितले जात असून एका लाभार्थ्याने सचिवाचे प्रकरण उजेडात आणले असून सदर ग्रामपंचायत सचिव यांनी वरिष्ठ अधिकारी यांना पैसे द्यावे लागत असल्यामुळे दोन दोन हजार रुपये प्रत्येक बिलाच्या प्रमाणपत्र देताना घेत असल्यामुळे घरकुल धारक लाभार्थी यांनी नाराजी व्यक्त करीत सरपंच सुनीता काचिनवार यांना तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. गोर गरिब जनतेला लुटणाऱ्याचा तपास करून योग्य कारवाई करणण्यात यावे अशी चर्चा कापशी गावात सुरु आहे. यावर वरिष्ठ अधिकारी यांचे नाव समोर येत असल्यामुळे अधिकारी काय निर्णय घेणार, की मूग गिळून बसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top