Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उपरी येथे आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत कोविडशिल्ड चे लसीकरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - जगभरात चालू असलेल्या कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे जगजीवन विस्कळीत झाले असून सध्या को...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
जगभरात चालू असलेल्या कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे जगजीवन विस्कळीत झाले असून सध्या कोरोना ने हाहाकार माजवीला आहे. कोरोना पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्या करिता वय 45 वर्षे च्या वरील लोकांना कोविडशिल्ड ही लस देणे सुरु असून आज व्याहाड बुज प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत उपरी कापशी येथे लसीकरण केंद्र उघडण्यात आले.

उपरी जिल्हा परिषद शाळा मध्ये कोविडशिल्ड लसीकरण केंद्रा चे उदघाटन ग्रामपंचायत सरपंच कुमुदताई सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपरी आरोग्य उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री मरलावार, गणपत कोठारे. ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र  बोदलकर व आरोग्य विभागाची टीम आणि  ग्रामस्थ उपस्थित होते. लसीकरण करिता ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. लोकांना लस घेतलं तर मरते. ताप येते अशी भीती निर्माण झाली असल्यामुळे लोकांचे लसीकरणाला अल्पसा प्रतिसाद असले तरी भविष्यात मात्र कोरोना लस घेणे आवश्यक असल्यामुळे व ही लस कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट नसल्याने अफवाला बळी न पळता आपले कुटुंब आपली जबाबदारी समजून प्रत्येक व्यक्ती ने लसीकरण करून घावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री मरलावार यांनी केले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top