Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोडशी (खु) येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर व औषधांचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्टुडंट फोरम ग्रुप व ग्राम आरोग्य फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या उपक्रम शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - मागील सात वर्षांपास...

  • स्टुडंट फोरम ग्रुप व ग्राम आरोग्य फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या उपक्रम
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
मागील सात वर्षांपासून स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तालुक्यातील तरुणांचे अग्रणी संघटन आहे. शैक्षणिक प्रगतीचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या पण तालुका मागास असल्यामुळे ग्रुपच्या वाटचालीत अडचणी निर्माण होत होत्या. त्या अडचणीच्या मुळाशी जाण्याच्या उद्देशाने ग्रुपने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. त्या वाटचालीत सामाजिक दायित्वाचे कार्य हाती घेऊन शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेपणा दूर करण्याच्या हेतूने ग्रुप मागील सात वर्षांपासून कार्य करीत आहे.

स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना या ग्रुपची शाखा कोडशी (खु) येथे ग्राम आरोग्य फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने कोरपना तालुका कोरोना मुक्त करणे हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून ग्राम आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. प्रवीण येरमे सर याच्या सहकार्याने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ११० पेक्षा अधिक रुग्णाची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली. याचप्रमाणे ग्राम आरोग्य फाउंडेशनच्या माध्यमातून कोरपना परिसरातील वडगाव तसेच इतर ठिकाणी शिबिर घेत १००० पेक्षा अधिक रुग्णांना तपासून बहुसंख्य रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात आली.

आज अशा बिकट परिस्थिती सर्व सामान्य जनता भयभीत झाली आहे. रुग्णालयात जाण्यास घाबरत आहे. व्हायरस तापाचे लक्षणे आपल्या शरीरात दिसून येत आहे. पण आजच्या परिस्थिती रुग्णालयात जाण्याची मानसिकता मानवाच्या अंगात नाही. हेच निरखून स्टुडंट फोरम ग्रुपच्या संघटकानी पुढाकार घेतला, मदतीला ग्राम आरोग्य सेनेचे रुग्णसेवक दिनेश राठोड, संजय सोयाम, कुमरे मेजर, नागो मेश्राम, रवी मडावी, संतोष मडावी, लक्ष्मन कोरांगे धावून आले.

कोरपना येथे डॉ. येरमे सर कोरोना रुग्णांवर निःशुल्क उपचार करत आहेत. रुग्णांनी बरे झाल्यानंतर जातीभेद सोडून समाज सेवा करावी हिच माझी तपासणी फी, असे म्हणून डॉ. येरमे सर समाजाची सेवा करत आहे. असे उपक्रम यशस्वी होण्यात समाजाची बांधिलकी जपणाऱ्या अदृश्य हातांचा तितकाच वाटा आहे. त्याचेही ऋण मदतीच्या ओघातून दिसून येते.

हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठीउपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक सर, आबिद अली, किशोर बावणे, अनिल रेगुंडवार, अरुण डोहे,   राजु बुऱ्हान, घनश्याम पाचभाई, अँड श्रीनिवास मुसळे, दिवाकर धोटे, विजय पानघाटे, नदीम सय्यद, तुषार देरकर, दिनेश ढेंगळे, अंशुल पोतनुलवार, अशोक जरिले, प्रफुल भोयर या सर्वांनी सहकार्य व प्रेरणा दिल्याने हे शक्य होऊ शकले. तसेच कोडशी (खु) तेथे झालेल्या आरोग्य शिबिरात ग्रुपच्या संघटकाचा मोलाचा हातभार लागला आहे. त्यात कोडशी (खु) शाखा ग्रुपचे संघटक व सर्व मित्र परिवार संतोष मडावी, पंडित नाकले, मोहन वडे, कपिल मने, अनुज गेडाम, प्रफुल पिदुरकर, मधुकर इटकलवार, सचिन जरिले, नितिन जगनाडे, अंकित दुरवटकर, विशाल गेडाम यांचा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यात खारीचा वाटा होता. स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे या पुढे ही कोरोना लढ्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार अशी भावना ग्रुपच्या संघटकानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top