Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तेंदु संकलन करण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महिला गंभीर जखमी ; सावली तालुक्यातील घटना वाघाची दहशत कायमच.... आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - तेंदु संकलन करण्याकरिता गेलेल्या महिल...

  • महिला गंभीर जखमी ; सावली तालुक्यातील घटना
  • वाघाची दहशत कायमच....

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
तेंदु संकलन करण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दि.18 रोजी सकाळच्या सुमारास घडली. सदर महिला सावली तालुक्यातील गेवरा येथील रहिवासी असून शकुंतला दिवाकर चौधरी (50) असे जखमी महिलेचे नाव आहे.

सध्या ग्रामीण भागात तेंदु संकलन करण्याचा हंगाम सुरू आहे. गावातील महिला सोबत सदर महिला तेंदु संकलन करण्याकरिता गोसेखुर्दच्या मुख्य नहराकडे गेली होती. त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर अचानक हल्ला केला. सोबतीला असणाऱ्या महिलांनी आरडाओरड करून वाघाला हाकलून लावले व सदर महिलेची वाघाच्या तावडीतून सुटका केली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळ गाठून चौकशी करून जखमी महिलेचा अंतरगाव येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top