- वामन तुरानकर यांच्या प्रयत्नांना यश
गडचांदूर -
कोरोनाचा ग्रामीन भागात वाढता प्रादुर्भाव पाहता वामन तुरणकर यांनी मानोली उपकेंद्रात लसीकरण केंद्र द्यावे अशी मागणी शासनाकडे केली असता १६ मे पासून मानोली उपकेंद्रात कोविड प्रतीबंधक लसीकरण सुरु करण्यात झाले आहे. वय ४५ पेक्षा अधिक असलेल्या नागरिकांनी सोबत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सोबत आणून लसीकरण करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून ग्रामीण भागातील लोकांना लसीकरनासाठी दुसऱ्या शहरात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागत होती. लस न मिळाल्यास परत यावे लागायचे. कित्येक नागरिकांना ३-४ वेळा लस संपल्यामुळे वापस यावे लागले. ही समस्या पाहता परिसरातील अधिक लोकांचे लसीकरण व्हावे याकरिता आरोग्य विभागाकडे कासिकरणाची मागणी करण्यात आली होती. ती मागणी मान्य झाली असून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.