Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खत इंधन दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक - जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांना निवेदन रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - आज देशात आपल्याला अन्नध...

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांना निवेदन
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
आज देशात आपल्याला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी तसेच  दैनंदिन जीवनातील सर्वसामान्यांना जनतेला आज केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त होऊन जगावे लागत आहे राजस्थानी खताच्या किमती30 टक्क्यांनी वाढलेले आहे तसेच बियाणे च्या सुद्धा किमती वाजवीपेक्षा जास्त वाढलेले आहे इंधन दरवाढ व  जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीने तर सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे घराची आर्थिक घडी ही पूर्ण कपडे अस्ताव्यस्त झालेली आहे आता तर घरगुती गॅस हजार रुपयांवर जाऊन पोहोचलेला आहे उज्वला च्या नावाखाली गरिबांना फुकट कनेक्शन देऊन आता हजार रुपयांचा भुर्दंड त्यांच्यावर बसवला आहे शेतमजुरांनी तर आता परत चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केली आहे करोणा सारख्या महामारी ने अनेकांच्या नोकऱ्या गेलेले आहे काही कुटुंबातील कुटुंब प्रमुखच करोणा मुळे जग सोडून निघून गेल्यामुळे आधीच कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आलेली आहे अशाही परिस्थितीत भाजपाप्रणीत केंद्र सरकारने या सर्व वरील वस्तूच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेवर शेतकऱ्यावर अच्छे दिन आणून ठेवलेले आहे याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबरकर पाटील यांच्या नेतृत्वात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना कलेक्टर मार्फत निवेदन देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा यवतमाळ जिल्हा बँक उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले महिला प्रदेश सरचिटणीस क्रांती धोटे राऊत, महिला जिल्हाध्यक्ष सारिका ताजणे, तारीक लोखंडवाला, माजी समाज कल्याण सभापती लता खांदवे, लाला राऊत, दत्ता गंगासागर, रंजना आडे, मतीन भाई, नयन लुंगे, प्रकाश राठोड, अमित नारसे, चंद्रकांत ताजने, मन चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top