Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भाजपाच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नमो भोजन व्यवस्थेची सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भोजन व्यवस्थेचे उदघाटन खास.अशोक नेते यांच्या नेतृत्वात भाजयुमो व अल्पसंख्याक मोर्चा च्या माध्यमातून नागरिकांच...

  • खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भोजन व्यवस्थेचे उदघाटन
  • खास.अशोक नेते यांच्या नेतृत्वात भाजयुमो व अल्पसंख्याक मोर्चा च्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी उपक्रम

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचिरोली -
दि. 18 मे : कोविड च्या या लॉकडाऊन काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कोविड बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक नागरिक हॉटेल्स, नास्ता सेंटर बंद असल्याने उपाशी राहत असत याची जाणीव ठेवत सामाजिक भावनेतून भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने खासदार अशोक नेते यांनी भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली शहर व अल्पसंख्याक मोर्चा च्या माध्यमातून  रुग्णाच्या नातेवाईकांना भोजनदान करण्याचा संकल्प केला व काल दि 17 मे पासून रुग्णालय परिसरात स्टॉल उभारून नमो भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली.

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते फीत कापून नमो भोजन व्यवस्थेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर,भाजयुमो चे जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, नगरसेवक तथा शहर महामंत्री केशवजी निंबोड, महामंत्री विनोद देवोजवार, भाजयुमो चे शहर अध्यक्ष सागर कुमरे, सचिव सुहास उप्पलवार, अल्पसंख्याक मोर्चा चे शहर अध्यक्ष सलीमभाई शेख, महामंत्री इमरान शेख, जिल्हा महामंत्री जावेद अली सय्यद, व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

नमो भोजन व्यवस्थेच्या माध्यमातून दररोज सकाळी 11 वाजता व सायंकाळी 7 वाजता 150 लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भोजन व्यवस्थेचा रुग्णांच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top