- स्व. सुधाकरराव पिंपळकर मित्रमंडळाचा उपक्रम
कोरपना -
कोरोनावर उपाय करणारा काढा म्हणून गुळवेल काढ्याला महत्व दिले जात आहे अनेक खेडोपाडी, शहरात सुद्धा गुळवेल काढयाची विशेष मागणी आहे याचेच औचित्य साधत स्व. सुधाकरराव पिंपळकर मित्रमंडळाने सार्वजनिक गुडवेल काळा वितरित करण्यात आला समाजाचे आपण काहीतरी देने आहे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमकरिता वैद्य गुरू श्री सुरेश नल्लूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर जोगी, भास्कर जोगी, भारत पिंपळकर, इरफान शेख, रोशन आस्वले, राजकुमार बावणे, प्रवीण पिंपळकर, सुरेश गोरे, विठोबा पिंपळकर, सचिन राठोड, मंगेश फरकाडे, राकेश महाकुलकर, पवन नल्लूरवार, नितीन जोगी, यांनी परिश्रम घेतले.
काळा वाटपा दरम्यान राजाभाऊ गलगट यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, स्व. सुधाकरराव पिंपळकर भाऊंना समाजकार्य करण्याची खूप आवड होती त्यांचे कार्य पुढे नेण्याचा निश्चय मित्रमंडळाने केला व हीच खरी भाऊंना श्रद्धांजली आहे. यावेळी उपस्थित नागरिकांना कोरोनावर गुणकारी गुळवेल काढ्याचे वितरण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.