राजुरा -
काँग्रेसचे जेष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य डॉ. नामदेवराव करमनकर यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चयात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्तपरिवार शोकाकुल आहे. ते अंदाजे ६६ वर्षाचे होते. ते सन २०१७ मध्ये काँग्रेसच्या टिकीटावर जि.प. सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पत्नी सुद्धा माजी जिल्हा परिषद सदस्या राहिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील जनतेला ते किफायतशीर आरोग्य सेवा देत होते. जिप सदस्य म्हणून त्यांनी आपल्या क्षेत्रात अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात घर केले होते. त्यांची ही एक्झिट अनेकांच्या ह्रदयाला झटका देणारी ठरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.