Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथे 11 आस्थापनांवर कारवाई - दुकाने सील
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
व्यापाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी ...

  • व्यापाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू आहे. मात्र राजुरा शहरात शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आज दिनांक 11 मे रोजी तहसीलदार हरीश गाडे यांनी शहरातील 11 प्रतिष्ठानांवर कारवाई करत आस्थापने सील केलीत. शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार गाडे यांनी केलेले आहे.

संचारबंदी सुरू असल्यामुळे महसूल विभागातील पथक यांनी शहरात फेरफटका मारला. शहरातील काही दुकाने नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे लक्षात आले यावेळी पथकाने तात्काळ कारवाई करत दुकाने सील केली यामध्ये तनवीर साडी सेंटर, संसार कापड केंद्र, विहीन कलेक्शन, झाडे इलेक्ट्रिकल्स, नवाज मोबाईल शापी, वांढरे इलेक्ट्रिकल, श्री कृष्णा स्टील सेंटर, विवो आस्था मोबाईल, सर्वेश जनरल अंड गिफ्ट सेंटर, गौतम जनरल स्टोअर, ठाकरे मोबाइल दुकान या प्रतिष्ठानवर कारवाई करून सील करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग तोडण्यासाठी शासनाने नियमावली तयार केली असून याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. देशासमोर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान याप्रसंगी केले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून व्यावसायिकांनी सहकार्य करावे. ही कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अमित बनसोड, डोणगावकर, महसूल विभागातील कर्मचारी सुभाष साळवे, घोडसे, गोरे, चीडे, श्रीरामवार, देशमुख, अत्रे, पोलीस विभागातील अधिकारी यांनी केली. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top