Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांची दारु विक्रेत्यावर धाड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
42 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - कोरोनाच्या काळात दुसऱ्या वर्षी लाकडाऊन सुरु आहे, संचारबदीत प्रवासी...

  • 42 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल जप्त

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
कोरोनाच्या काळात दुसऱ्या वर्षी लाकडाऊन सुरु आहे, संचारबदीत प्रवासी वाहतुक बंद असताना सुध्दा तालुक्यासह सावली मुख्यालयात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी, मोहफुलाची दारु विक्रीला उधाण आली आहे, अनेक ठिकाणी छापे मारुनही लहान मोठ्या कारवाहीला न जुमानता दारु विक्रेत्यांनी आपला बेधुंद दारु विक्रीचा धंदा सुरुच ठेवला आहे, अशातच नुकताच गुत माहीतीच्या आधारे सावली नगरातील एका दारु विक्रेत्यावर धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा पकडण्यात आला.

यात 90 एम एल 40 नग,टिल्रु, आर एस 90 एम एल 27 नग , डमरी फिशर 90  नग ,एम डी 80नग असे एकुण 236 नग एकुण किंमत 42हजार 900 रुपयांचा माल दारु विक्रेत्याचा घरी रात्री धाड टाकुन पकडण्यात आला. अवैद्य दारु विक्रेता सारंग उर्फ युवराज कुंभारे (३५) वर्ष सावली यांच्या विरुध्द 65 ईं  मोदाका अंतर्गत कारवाही करण्यात आली. 

राज्यासह देशात कोरोनाच्या दुस-या टप्प्यात राज्यात कोरोना बाधीताची व मृत्यु चे प्रमाण वाढत असताना संचारबंदीच्या काळात पोलीस विभागाची भुमिका योग्य दिसत आहे, लोकांना गर्दी करु नये, वाहन तपासणी असे कार्य पोलीस करीत असताना मात्र याचा फायदा घेत अवैद्य दारु विक्रेते बिनधास्त दारु विक्रीचे काम करीत आहे  रात्रिच खेल चाले या शुभासिता प्रमाणे दारुचि विक्री जोमात सुरु आहे त्यामुळे पोलीस विभागाला कोरोना च्या काळात अवैद्य विकरिवर अकुंश लावणे कठीण होतं चालले आहे

नुकतीच गोपनिय माहीतीच्या आधारे एका अवैध दारु विक्रेत्यावर कारवाही करण्यात आली यामुळे तालुक्यासह सावली शहरात दारु विक्रेत्याचे धाबै दणाणले‌ आहे. सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पि एस आय वासनिक, एस आय बोधे, पो.शी स्वप्नील , निलेश ,श्रीकांत दिपक डोंगरे यांनी कारवाही केलीअसून पुढील तपास सुरु आहे ....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top