Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते मारोडा येथे मास्क व सॅनिटाईजर वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मास्क वापरा, सुरक्षित राहा, काळजी घ्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे आवाहन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स मूल - तालुक्यातील...

  • मास्क वापरा, सुरक्षित राहा, काळजी घ्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे आवाहन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मूल -
तालुक्यातील मारोडा येथे आज जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते मास्क व सॅनिटाईजर वाटप करण्यात आले. सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे दररोज १००० ते १२०० चे रुग्ण आढळून येत असून ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोना या महामारीने सर्वांना घाबरून सोडले आहे. दररोज वेगवेगळे आकडे बघायला मिळत आहे त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणीही कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये. 

सर्वांनी मास्क, सॅनिटाईजर आणि सामाजिक अंतर या त्रिसुत्री चे पालन करावे, आपल्याला कोरोणाचे चे लक्षण आढळून आल्यास कोणीही घाबरून न जाता त्वरित दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी व सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी केले आहे.

यावेळी ग्राम पंचायत मारोडा येथील सरपंच श्री. भिकारूजी शेंडे, भाजपा युवा कार्यकर्ते श्री. नरसिंगजी गणवेलवार, श्री. सचिनजी गुरनुले उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top