शुभम तायडे हा कोरोनावर उपचार करतो अशा थापा मारत होता. आपल्या अंगात शेषनाग अवतरतो असं तो लोकांना सांगायचा. या ढोंगी बाबाचं कारस्थान एमआयडीसी पोलिसांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने उधळून लावलं.
गुरुवारी 13 मे रोजी सापळा रचत पोलिसांनी रात्री 9 वाजता बाबाच्या दरबारात धाड टाकली. विशेष म्हणजे राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध असतानाही तेथे 50 च्या वर भक्तमंडळी गर्दी करून होते. यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा आळोखेपिळोखे देत फुसफुस करत होता. मात्र, पोलीस दिसताच त्याचे फुसफुसणे अचानक बंद झालं.
दरम्यान, पोलिसांनी बाबाला जादूटोणाविरोधी कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा 2013 नुसार अटक केली. यासोबतच लॉकडाऊनमध्ये भक्तांना गोळा केल्याचा गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला. बाबाला अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती. बाबाला सोडण्याची मागणी व पोलिसांविरोधात घोषणाबाजी यावेळी केली जात होती. पोलिसांनी जेव्हा समजून सांगितलं त्यानंतर ती गर्दीही ओसरली.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.