- स्थानिक गुन्हे शाखा टीमची कार्यवाही
- मृतकाचे पत्नीने आरोपींना अटक केल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही दिला होता इशारा
कुख्यात आरोपी देवा नौकरकार हा आपली गैंग बनवून अवैध दारूचा व्यवसाय सट्टापट्टी व गांजा विक्री या व्यवसायात असायचा याचेवर वरोरा पोलीस स्टेशन मध्ये व इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. खरं तर याला प्रशासनाने तडीपार करायला हवे होते पण मानसिक संतुलन बिघडल्याचे नाटक करून अनेकदा त्यांनी पोलीस प्रशासनाला चकमा देऊन स्वतःला वाचवले आहे. एकेकाळी मृतक आबीद शेख व देवा नौकरकार यांची दोस्ती होती व दोघेही मिळून अवैध व्यवसाय करायचे. याचा धंदा वाढला होता व त्याचे पैशांच्या वादावरून आबीद शेख यांच्यासोबत वैर झाले होते एवढेच नव्हे तर देवा हा आबीदला ठार मारण्याच्या धमक्या देत होता व त्याच्या वडिलाला सुद्धा तुझ्या मुलाला मी ठार करतो म्हणून धमकी द्यायचा आणि त्याने अवैध पद्धतीने सहा राऊंड माऊजर विकत घेवून आबीद शेख याला ठार मारण्याचा कट रचत होता आणि काल त्याने अखेर डाव साधला आणि आबीद शेख याचा खून केला होता.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.