- युवा स्वाभिमान पार्टीचे सुरज ठाकरे यांनी केली मागणी
- खासदार नवनीत राणा यांनीही केला पाठपुरावा
चंद्रपूर -
औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात एशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा महाऔष्णिक विद्युत केंद्र असून जिल्ह्यात बहुतांश कोळसा खाणी व विविध सिमेंट कंपन्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनसंख्येत ३० ते ४० टक्के कामगार वर्ग आहे. यामुळे कामगारां संदर्भातल्या समस्या व कामगार काम करीत असलेल्या शासकीय व खासगी आस्थापनां बाबतच्या तक्रारीतमध्ये सातत्याने दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक केल्या जात आहे, यामुळे हे कामगार न्यायाकरिता, स्वहक्कासाठी केंद्रीय श्रम आयुक्त यांच्याकडे धाव घेतात पण आयुक्त कार्यालयात हजरच नसल्याच्या तक्रारी कामगारांकडून सातत्याने येत होत्या. त्यामुळे कामगारांच्या समस्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
सध्या असलेल्या आयुक्तांवर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या ३ जिल्ह्याचा प्रभार असल्यामुळे चंद्रपूर येथील केंद्रीय श्रम आयुक्त कार्यालयात आयुक्तांचे गैरहजरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे चंद्रपूर येथे स्थाई तथा कायमस्वरूपी केंद्रीय श्रम आयुक्त देण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष यांनी केली. ठाकरेंनी खासदार सौ. नवनीत राणा यांच्या माध्यमातून थेट केंद्रीय श्रम मंत्रालयामध्ये शिफारस व मागणी केली असून खासदार सौ. नवनीत राणा यांनी सुद्धा यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. जिल्ह्यात स्थाई तथा कायमस्वरूपी केंद्रीय श्रम आयुक्त मिळाल्यास कामगारांच्या समस्या लवकरच निकाली निघेल असे मत कामगारांनी व्यक्त केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.