Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कार्य करणारा खरा कोरोना योद्धा - माजी आमदार अँड संजय धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रधानमंत्री मा.नरेंद्रभाई मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा राजुरा तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार आरोग्य सेवा सप्ताह दिन म्हणून सा...

  • प्रधानमंत्री मा.नरेंद्रभाई मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा राजुरा तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार
  • आरोग्य सेवा सप्ताह दिन म्हणून साजरा
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र जनतेची सेवा देत आपले कार्य नियमित पणे करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधव, सफाई कर्मचारी, खरे कोरोना योद्धा असल्याचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे राजुरा नगर परिषद येथील आरोग्य विभागाचे सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य सेवा सप्ताह दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा अंतिम संस्कर करणारे सफाई कर्मचारी यांनी आपली निरंतर सेवा देत आपले कर्तव्य पार पाडत कार्य केले. अश्या व्यक्तींचा माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या पुढाकाराने शाल, शिफळ व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. 

प्रधानमंत्री मा.नरेंद्रभाई मोदी हे गोरगरीब जनतेकरीता कल्याणकारी अनेक योजना राबवित कार्य करीत आहे. असेच कार्य करण्याचा संकल्प करीत भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे गरजू लोकांना सहकार्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत केंद्रातील मोदीजी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे, सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपा जिल्हा सचिव हरिदास झाडे, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य संजय उपगनलावार, भाजप तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजप नेते महादेव तपासे, सुरेश रागीट, मंगेश श्रीराम, गणेश रेकलवार, जनार्धन निकोडे, रत्नाकर पायपरे, कैलास कार्लेकर, प्रशांत साळवे, संदीप मडावी आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 









Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top