Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: सावधान आकडा वाढतोय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
24 तासात तब्बल 637 नवे रुग्ण ; पाच बाधितांचा मृत्यू श्रवण कुमार -  आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर, दि. 07 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात...

  • 24 तासात तब्बल 637 नवे रुग्ण ; पाच बाधितांचा मृत्यू

श्रवण कुमार -  आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 07 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 288 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 637 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून पाच बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 30 हजार 500 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 700 झाली आहे. सध्या 3353 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 88 हजार 692 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 53 हजार 825 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर येथील 67 वर्षीय पुरूष, शिवाजीनगर तुकुम येथील 74 वर्षीय पुरूष व सिस्टर कॉलनी येथील 68 वर्षीय पुरूष, यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील 58 वषी्रय पुरूष व मारेगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 447 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 405, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 18, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 637 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 190, चंद्रपूर तालुका 37, बल्लारपूर 38, भद्रावती 54, ब्रम्हपुरी 25, नागभिड 25, सिंदेवाही 10, मूल 21, सावली 12, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी आठ, राजूरा 13, चिमूर 48, वरोरा 102, कोरपना 34, जीवती तीन व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top