Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना ; भीती नको काळजी हवी - डॉ. मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरोना व्हायरसची लक्षणे आणि उपाय JCI राजुरा प्राईड च्या ऑनलाईन झूम वेबिनार ला उत्स्फूर्त प्रतिसाद अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिध...

  • कोरोना व्हायरसची लक्षणे आणि उपाय
  • JCI राजुरा प्राईड च्या ऑनलाईन झूम वेबिनार ला उत्स्फूर्त प्रतिसाद

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
आतापर्यंत भारतात लाखो लोकांनी कोव्हिड-19 वर यशस्वीरित्या मात केली आहे. योग्यवेळी निदान, औषधोपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर लोकांनी कोरोनावर विजय मिळवलाय पण मधल्या काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा कोरोना ची नवीन लाट पसरली असून या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध लागेल का या विचाराने सध्या समाजमन सुन्न झाले आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी गरज आहे त्रिसूत्राचे म्हणजेच मास्क. वारंवार साबणाने हाथ धुणे आणि सामाजिक दुरी चे पालन करण्याची. प्रत्येकांनी कोरोनाची भीती सोडून काळजी घ्यावी असे प्रतिपादन 

इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपुर चे अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल चे कार्यकारी सदस्य, चंद्रपुर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ईएनटी चिकित्सक डॉ. मंगेशजी गुलवाडे सर यांनी केले. ते जागतिक आरोग्य दिनानिमित्य JCI राजुरा प्राईड द्वारे आयोजित ऑनलाईन झूम वेबिनार मध्ये बोलत होते. 

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून JCI राजुरा प्राईड ने कोरोना व्हायरसची लक्षणे आणि उपाय या विषयावर ऑनलाईन झूम वेबिनार चे आयोजन केले होते. ता वेबिनार मध्ये डॉ. गुलवाडे पुढे म्हणाले कि, जगभरात करोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातले आहे. भारतातही करोना व्हायरस बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरस आणि सामान्य तापाच्या लक्षणांमध्ये बरेच साम्य आहे. पण घाबरून जाऊ नका. सरकारी नियम किंवा फॅशन म्हणून मास्क चा वापर करू नका.

नमूद केलेल्या बाबीचे पालन करा -

  • - साबण आणि पाण्याने हात स्वच्छ ठेवा
  • - शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल ठेवा
  • - सर्दी, ताप झालेल्यांपासून शक्यतो लांब राहा
  • - जंगली किंवा पाळीव प्राण्यांपासून दूर राहा
  • - कच्चं किंवा अर्धवट शिजवलेलं मांस खाणं टाळा
  • - बाहेर पडताना मास्क घाला
  • - नियमित व्यायाम करा 
  • - खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या

देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात केली आहे. पण 

“लोक अजूनही विचार करत आहेत लस घ्यायला हवी की नको. त्यामुळे या विषयावर जनजागृती करणं महत्त्वाचं झालं आहे." या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कार्य जेसिस ने करावे. असेही डॉ. गुलवाडे म्हणाले. 

JCI राजुरा प्राईड च्या सदस्या व्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय विद्यार्थ्यांनी तसेच शेकडो नागरिकांनी ऑनलाईन झूम वेबिनार चा लाभ घेतला. प्रास्ताविक प्राईड चे माजी अध्यक्ष जेसी दीपक शर्मा, आभार प्राईड चे अध्यक्ष जेसी अंकुशसिंह चौहान यांनी केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष जेसी श्रीगोपाल सारडा, व्यंकटेश गड्डम, श्वेता जयस्वाल, संदीप खोके, सचिव जहीर लखानी प्रामुख्याने उपस्थित होते. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top