Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पाण्यासाठी महीलांचा टाहो ; सावलीतील पाणी समस्या पेटणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
७ दिवसाच्या आत यावर तोडगा काढा तोडगा न निघाल्यास नगरपंचायती समोर महिलांचा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कुमारी पोर्णिमा फाले - आमला विदर्भ ता...

  • ७ दिवसाच्या आत यावर तोडगा काढा
  • तोडगा न निघाल्यास नगरपंचायती समोर महिलांचा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

कुमारी पोर्णिमा फाले - आमला विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
सावली शहरातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती दिसत आहे. महिलांना भर उन्हात लांबवरुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. साध्या नळाचा गेल्या चाडे चार महिन्यापासुन पत्ताच नाही, तर फिल्टर नळाचा सुध्दा लंपडाव दिसत आहे.

सावली शहरात ग्रामिण पाणीपुरवठा व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु मागील पाच सहा महिन्यापासुन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहेत त्यामुळे मुख्य जल वाहिनी आल्याने ती फुटली, तसेच नवीन वाढीव पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. त्याचे पाईप लाईन टाकत असतांना अनेक ठिकाणी जुनी पाईप लाईन फुटत आहे. एवढेच नाही तर नगर पंचायत कडे टी पाईंट चे नकाशा नाहीत त्यामुळे कोणती पाईप लाईन फुटत आहे हे तेथील कर्मचाऱ्यांना माहीत नाही. या सर्वामुळे पाणी पुरवठा बंद आहे व जनतेला विशेषत: महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

‌‌दोनदा मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दि. ६ एप्रिल ला सुद्धा निवेदन देऊन सात दिवसांच्या आत साधे नळाचा पाणीपुरवठा नियमीत सुरु करण्याची मागणी करण्यात अली आहे. कारण सर्वात जास्त नळ कनेक्शन हे साधे नळाचे आहेत. ७ दिवसाच्या आत यावर तोडगा न काढल्यास चक्क नगरपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रभाग क्रमांक १, २ व ३ येथील महिलांनी दिला आहे. निवेदन देतांना धनराज वाळके, यशोदा वनकर, सुरेखा थोरात, वामन देवगडे, भाग्यवान घोनमोडे, सविता सेमस्कार व शेकडो महिला उपस्थित होत्या. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top