Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्ह्यात कोरोना उद्रेक सुरूच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन बाधितांच्या मृत्यू ; 353 नव्याने पॉझिटिव्ह 24 तासात 120 जणांनी केली कोरोनावर मात 2291 बाधितांवर उपचार सुरू file photo श्रावण कुमार - आमच...

  • तीन बाधितांच्या मृत्यू ; 353 नव्याने पॉझिटिव्ह
  • 24 तासात 120 जणांनी केली कोरोनावर मात
  • 2291 बाधितांवर उपचार सुरू
file photo

श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात मागील 24 तासात 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 353 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचे मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 110 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 390 झाली आहे. सध्या 2291 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 76 हजार 112 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 44 हजार 375 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये वार्ड नं. 16, मूल, येथील 67 वर्षीय पुरूष, रामनगर, चंद्रपूर येथील 38 वर्षीय पुरूष व महाडोली वरोरा येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 429 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 389, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 353 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 102, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपुर 11, भद्रावती 37, ब्रम्हपुरी तीन, नागभीड दोन, सिंदेवाही सात, मूल 13, सावली सहा, गोंडपिपरी एक, राजूरा 10, चिमूर 36, वरोरा 74, कोरपना 21, जीवती तीन व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top