Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तालुक्यातील 50 ग्राम पंचायता पैकी अनेक ग्राम पंचायती सरपंचा विना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरपंच विना उपसरपंचाला मिळाली पावर जाती निहाय सरपंच आरक्षण सोडतीतील सावळा गोंधळ आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - मिनी मंत्रालयाच्या निव...

  • सरपंच विना उपसरपंचाला मिळाली पावर
  • जाती निहाय सरपंच आरक्षण सोडतीतील सावळा गोंधळ
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचे सुप वाजले, निवडणुका शांततेत पार पडल्या सोबतच सरपंच पदाचे आरक्षण सोडती नंतर सरपंच विराजमान झाले. मात्र काही ग्राम पंच्यायत मधे जाती निहाय सरपंच आरक्षण सोडतीत काहीसा गोंधळ झाल्याने तालुक्यातील अनेक ग्राम पंचायत सरपंचविना अधुऱ्या असल्याचे दिसून येत आहे. 

मागील महिन्यात सावली तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक झाली व त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत निघाली, तिन ट्प्पयात सरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली होती. परंतु सरपंच पदाचे आरक्षण पडल्यानंतर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये त्या प्रवर्गाचे उमेदवार नसल्याने सरपंच पद रिक्त ठेऊन उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. परंतू एक महिन्यांचा कालावधी लोटूनही काही ग्रामपंचायतीचा सरपंच विना कारभार चाललेला दिसत आहे. 

तालुक्यात ग्रामपंचतीची सार्वत्रिक निवडणुक व त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण व सरपंच पदाची निवडणुक कार्यक्रम आटोपला परंतु यात सावली तालुक्यातील व्याहाड बुज, जिबगांव, लोंढोली, वाघोली बुट्टी, साखरी, निमगांव, बेलगांव, पारडी आदी गावासोबत काही ग्रामपंचायत मध्ये सरपंच विना कारभार दिसुन येत आहे. या ग्रामपंचायतीत जे सरपंच पदाची आरक्षित सोडत निघाली त्या प्रवर्गाचा निवडणुक आलेला सदस्य नसल्याने सरपंच पद रिक्त ठेऊन उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. आता या ग्रामपंचायतीत नविन सुधारीत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करुन निवडणुक घ्यावी अशी एकमुखी मागणी संबंधित ग्रामपंचायतीतील सदस्यासह गावकरी करीत आहेत. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top