Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा आगाराचे डिझेल संपले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
९० टक्केहुन अधिक बसफेऱ्या रद्द शाळकरी मुलांना घरी पाठविण्याकरिता महामंडळ कर्मचाऱ्यांची झाली दमछाक अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिध...

  • ९० टक्केहुन अधिक बसफेऱ्या रद्द
  • शाळकरी मुलांना घरी पाठविण्याकरिता महामंडळ कर्मचाऱ्यांची झाली दमछाक
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
एसटी महामंडळाच्या राजुरा आगाराचे डिझेल संपल्यामुळे अनेक मार्गावरील बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहे. शाळकरी मुलांना परत घरी पाठविण्याकरिता मात्र आज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. शिल्लक असलेले डिझेल व बसफेऱ्या पूर्ण करून आलेल्या बसेसच्या टंकीमधून डिझेल काढून अतिदुर्गम नगरळा, जिवती, पुडियाल मोहदा, धिडशी व अन्य काही गावातील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. डिझेलअभावी बसफेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवांश्यासह एसटी महामंडळालाही फटका बसला आहे. अशी नामुष्की का उद्धभवली यावर एसटी महामंडळाने गंभीरपूर्वक विचार करून योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.  



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top