- कोरोना प्रतिबंधक लसीकरणास उर्स्फूत प्रतिसाद
गावामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या वारंवार पाठपुरावामुळे दिनांक २० एप्रिल ला जिल्हा परिषद शाळा येथे कोविड-19 लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. गावाला एकूण 150 लसीची उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यानुसार 100 % लसीकरण उद्दिष्टे पूर्ण झाले या लसीकरणाला गावाचे प्रथम नागरीक सरपंच गणपत चौधरी, उपसरपंच बालनाथ काळे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष पिंपळशेंडे, ग्रामसेवक राजु पिदुरकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत लसीकरण पार पडले.
यावेळी जिप सदस्य ब्रिजभुषण पाझारे यांनी सदिच्छा भेट देत पाहणी केली. लसीकरण मोहिमेला सी.एच.ओ. अश्विनी कोडापे. आरोग्य सेविका एस.डी.सहारे, आरोग्य सेवक प्रफुल पराते, ANM ज्योती वाकुलकर, प्रतिभा चौधरी, आशा वर्कर छाया चौधरी, ग्रापं सदस्या निकिता वाकुलकर, राहुल ठावरी, संगणक परिचालक भुवनेश्वर गोरे, ग्रापं कर्मचारी मारोती राजूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.