- सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाला निःशुल्क भाजीच्या रूपात मदत करणारा दानी हरपला
राजुरा -
शहरात किंवा तालुक्यात कोणतेही लहान मोठे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाच्या महाप्रसादाला भाजीच्या रूपात स्वतःहून निःशुल्क भाजी देणाऱ्याला आज नियतीने हिरावले. कोणत्याही महाप्रसादाच्या कार्यक्रमाला भाजी चे दान करणारे ठोक भाजी विक्रेते बंडूभाऊ भोज यांचे आज सकाळी ७ वाजता चंद्रपूर ला दुःखद निधन झाले ते ४७ वर्षाचे होते. बंडूभाऊ ला आज सकाळी ४ वाजेपासून छातीत त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यावरून लगेच त्यांना चंद्रपूर नेण्यात आले. चंद्रपूर ला ७-८ दवाखाने फिरल्यानंतरही त्यांना दवाखाण्यात घेण्यात आले नाही. अखेरीस सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई, बाबा, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंतिम संस्कार होण्याचे माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या अचानक निधनाच्या वार्तेने नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बंडुभाऊ भोज यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
उत्तर द्याहटवापरत एकदा राजुरा ग्रामीण रूग्णालय शोभेची वस्तू ठरलेली आहे.याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.