Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने तीन जनावरांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केळझर येथील घटना, शेतकऱ्यांचे नुकसान तीन बैल व एका गाईचा मृत्यू अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरुर स्टे. - राजुरा तालुक्यातील केळझ...

  • केळझर येथील घटना, शेतकऱ्यांचे नुकसान
  • तीन बैल व एका गाईचा मृत्यू

अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर स्टे. -
राजुरा तालुक्यातील केळझर येथे जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोन बैल व एका गाईचा मृत्यू झाला.या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राजुरा तालुक्यातील केळझर येथे नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन जनावरांना अचानक जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत देवराव भोंगळे यांच्या मालकीचा एक बैल,बालाजी टोंगे यांची एक गाय तर प्रभाकर मडावी यांच्या मालकीचा एक बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे जवळपास १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.वातावरणात बदल झाल्याने शनिवारी सायं. अचानक वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे वीज खांबावरील जिवंत वीज तारा तुटून खाली पडल्या. रविवारी केळझर येथील जनावरे पाणी पिण्यासाठी गेले असता तीन जनावरांना पडून असलेल्या जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत शेतात कसणारे दोन बैल व एक दुभती गाय मरण पावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top