Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या सरपंचाशी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षाची अरेरावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पीक कर्ज भरावयास येणाऱ्या शेतकऱ्यांना राहावे लागते टाळकळत वीर पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी (ग्रामीण) राजुरा - काढोली (बूज) सेवा सहकारी संस...

  • पीक कर्ज भरावयास येणाऱ्या शेतकऱ्यांना राहावे लागते टाळकळत
वीर पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा -
काढोली (बूज) सेवा सहकारी संस्था येथील शेतकरी सुहास झाडे स्वतःचे पीककर्ज परतफेड करण्याकरिता सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात गेले असता सेवा सहकारी संस्थेच्या सचिव कार्यालयात उपस्थित नसल्या मुळे शेतकरी सुहास झाडे लागूनच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात गेले आणि सरपंचाची भेट घेत सांगितले की त्यांना स्वतःचे पीककर्ज भरायचे आहे. परंतु सेवा सहकारी संस्थेचे सचिव कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे व सतत मागील काही दिवसांन पासून संबंधित सहकारी संस्थेच्या कार्यालयात फेऱ्या मारीत आहे. परंतु त्यांचेशी भेट झाली नाही. घेतलेले पीककर्ज फेडून करून नवीन कर्ज घेणे आवश्यक असल्याने तुमच्या कडून कुठली मदत होईल का या आशेने तुमच्या कडे आलो आहे. तुमच्याकडे सचिव मॅडम यांच्या दूरध्वनी क्रमांक असल्यास त्यांना माझ्या मागील पीककर्जाची परत फेड किती आहे आणि त्या पिकर्जावर व्याज किती आकारण्यात आले आहे. याची माहिती मिळाली तर मला माझे पीककर्ज भरण्यास फारसी मदत होईल. त्यावेळी सरपंच्यानी सचिव यांना दूरध्वनी द्वारे संबंधित माहिती विचारली असता त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला. तेवड्यात संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षानी सरपंचास दूरध्वनी केला आणि अरेरावी करत तुझी हुकूमशाही चालली आहे का? तुला माहिती द्यायला ही माहिती विचारांचा तुझा अधिकार नाही? सरपंच आणि संस्थेच्या अध्यक्षा मधील संभाषण एकूण शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आता भोळ्याभाबळ्या शेतकऱ्यांनी कुठे दाद मागायची. लहानसहान बाबीसाठी हि तालुकास्तर, जिल्हास्तर गाठायचे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top