Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विहिरीत पडलेल्या वाघाच्या पिलाला वनविभागाने सुखरूप बाहेर काढले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुशी दाबगावं वन बीटातली दुसरी घटना कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सावली - वन परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या उपवनपरिक्षेत्...

  • सुशी दाबगावं वन बीटातली दुसरी घटना
कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
वन परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या उपवनपरिक्षेत्र केलझर येथील सुशी दाबगावं बिटात भाऊजी घोंगडे यांचे शेतातील विहिरीत बुधवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान  वाघाचा बछडा पडला. ही बाब वेळीच वन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्याने वनविभागाने त्याला सुखरूप बाहेर काढले.
मुल तालुक्यातील दाबगाव येथे भाऊजी घोंगडे यांचे शेतातील विहिरीत चार साडेचार महिन्याचा वाघाचा बछडा पडलेला आढळला. ही माहीती त्वरीत चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देन्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. मुल येथील संजीवन पर्यावरन संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, मनोज रणदिवे, पंकज उजवने, राहुल जिरकुंटवार, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल आक्केवार, अंकुश वानी, प्रतीक लेनगुरे, संकल्प गणवीर, यश मोहुर्ले हे सुध्दा घटनास्थळी त्वरीत उपस्थित झाले. अतीशीघ्र कृतीदल चंद्रपुर व अतिशीघ्र कृतीदल ताडोबाचे राजु बडकेलवार, अजय मराठे व टीम यांनी विभागीय वन अधिकारी सारीका जगताप मैडम यांच्या मार्गदर्शनात वरीष्ठ वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR यांच्या नेतृत्वात जलद बचाव दल यांनी कॅच पोल (Catch pole) च्या सहायानेवाघाच्या बछड्याला सुखरूप विहिरीबाहेर काढून पिंजऱ्यात टाकले. सदर वाघाच्या बछड्याला पुढील उपचार करिता चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे नेण्यात आले. या सर्व कार्यवाही दरम्यान सहाय्यक वनसरंक्षक श्रीनिवास लखमावाड, आर.एफ.ओ. कारेकार, डॉ.पोडचलवार क्षेत्र सहाय्यक खनके, क्षेत्र सहाय्यक मेश्राम, वनरक्षक गुरनुले, मानकर, मरस्कोले, रोगे, मडावी मैडम व पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते.  







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top