Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कडक निर्बंधच्या तिसऱ्या दिवशी राजुरा पोलिसांची धडक कार्यवाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मास्क न वापरणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या 30 वाहन चालकावर केली कारवाई अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - कोरोना व्हायरसचा प्...

  • मास्क न वापरणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या 30 वाहन चालकावर केली कारवाई

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तरीही अनेक नागरिक या सूचनांचं पालन करताना दिसत नाही. कडक निर्बंध लागू असतांना सुद्धा लोक मास्कविना आणि विनाकारण फिरत आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा धोका वाढत असताना काही नागरिक या आदेशाकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांचे मार्गदर्शनात विना मास्क, विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्या वाहन चालक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दि. १६ ला झालेल्या कार्यवाहीत 38 वाहन चालकावर कारवाई करीत 6 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर आज दि. १५ ला झालेल्या कार्यवाहीत 30 वाहन चालकांवर कारवाई करीत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मास्कविना, अतिमहत्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर निघू नये असे शहरातून पोलीस ध्वनीक्षेपा द्वारे लोकांना माहिती देत आहेत. कारवाई शहरातील मुख्य चौकात केली जात आहे. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक झुरमुरे, सहायक पोलिस निरीक्षक दरेकर, अरुण कुकुडकर, राधेश्याम यादव, उमेश रामटेके, प्रशांत येडे, संपत बंडी आदी पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांनी केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top