Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना लसीकरणासाठी घर ते केंद्र मोफत प्रवास मोहीम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांचा उपक्रम कुमारी पौर्णिमा फाले तालुका प्रतिनिधी सावली - राज्यात कोरोनाचे संकट वाढत असतांना 45 वर्षावरी...

  • पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांचा उपक्रम

कुमारी पौर्णिमा फाले तालुका प्रतिनिधी
सावली -
राज्यात कोरोनाचे संकट वाढत असतांना 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणाची सुविधा आहे. मात्र ग्रामीण भागात लसीकरणाबाबत गैरसमज असल्यामुळे व लसीकरण केंद्रापर्यंत प्रवासाची सोय नसल्यामुळे लसीकरण कमी होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी त्यांचे क्षेत्रातील गावात घर ते लसीकरण केंद्र मोफत प्रवास मोहीम हाती घेतली आहे.

कोरोना लस घेतल्यामुळे मृत्यू होऊ शकतो, लस घेतेवेळी कोरोना चाचणी करतात, लस घेऊनही कोरोना होते अशा अफवांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यास उत्सुक नाही. हा अनुभव सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांचे लक्षात आला. लोकप्रतिनिधी फक्त पाच वर्षात निवडणुकीचे काळात संपर्कात येत असतात पण सभापती विजय कोरेवार हे नेहमी लोकांच्या संपर्कात राहून काम करीत असतात. त्यांनी एक मोहीम सुरू केली असून त्यांचे क्षेत्रातील प्रवासाची सोय नसलेल्या आदिवासी जंगल भागात प्रत्यक्षात जाऊन नागरिकांना समजावून लसीकरणासाठी तयार करीत आहेत व घर ते लसीकरण केंद्रापर्यंत मोफत प्रवासाची व्यवस्था स्वखर्चाने करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे त्या भागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top