Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोणाच्या आशीर्वादाने मोखाळयात दारुचा महापुर?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुमारी पौर्णिमा फाले तालुका प्रतिनिधी सावली - एकीकडे राजुरा तालुक्यातील खर्रा वाटून खाणारे 6 मित्र पॉसिटीव्ह झाल्याचे उदाहरण ताजे असतांना मा...

कुमारी पौर्णिमा फाले तालुका प्रतिनिधी
सावली -
एकीकडे राजुरा तालुक्यातील खर्रा वाटून खाणारे 6 मित्र पॉसिटीव्ह झाल्याचे उदाहरण ताजे असतांना मात्र सावली तालुक्यातील मोखाळा येथे मागिल काही दिवसांपासुन अवैध दारूविक्रीने कळस गाठला आहे. सध्या राज्यात संचारबंदी असूनही मोखाळा येथे दामदुप्पट दराने अवैध दारूविक्री होतं आहे. येथील एका विक्रीत्या कडुन विदेशी दारू ४०० ते ४५० रूपये प्रति तर देशी दारू ७० ते ८० रुपये टिलु या दराने विक्री केली जात आहे. गावापासून जवळ असलेल्या व्याहाड खुर्द येथे पोलीस चौकी आहे मात्र सावली पोलीस आणि व्याहाड खुर्द चौकीतील पोलिसांचे या अवैध दारूविक्रीला अभय तर नाही ना अशी कुजबुज परिसरात जोमाने सुरु आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे लक्ष देऊन स्थानिक गुन्हे शाखेमार्फत धाड टाकून अवैध दारु विक्रेत्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी विशेषतः महिलांनी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top