- वेकोलि धोपटाला टाऊनशिप कॉलनी राजुरा येथील घटना
- चंद्रपूरला बेड न मिळाल्याने अमरावतीला नेले
वेकोलिच्या सास्ती धोपटाला या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याचे बाजूला एक सीमेंटचा चबुतरा आहे. खाणीतील काम संपल्यावर सायंकाळी या चबुतऱ्यावर येऊन गप्पागोष्टी करीत टाइमपास करणे, या वसाहतीतिल सहा कामगार मित्रांचा छंद होता. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यातही यात खंड पडला नाही. अर्थात या चर्चेचे वेळी काहींना खरा व तंबाखू खाण्याचा छंद होता.
या गोष्टी एकमेकांना आग्रह करून भरविण्यात त्यांना मित्रत्वाचा खरा अनुभव येत असावा. पण नुकताच यापैकी एकाला ताप आला आणी त्याने कोरोना तपासणी केली तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान झाले. यानंतर या सर्वच मित्रांनी कोरोना तपासणी करण्याचे ठरविले. तपासणी नंतर सर्वच सहाही मित्र पॉझिटिव्ह आले. यापैकी एकाला चंद्रपूरला बेड न मिळाल्याने त्याला अमरावतीला पाठविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.