Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सावली नप अंतर्गत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना झालीफेल शेकडो फाइल धूळखात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुमारी पोर्णीमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सावली - घरकुल मिळन्यासाठी रमाई आवास, शबरी त्याही पलीकडे सर्वसमावेशक पंतप्रधान आवास योजना...


कुमारी पोर्णीमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
घरकुल मिळन्यासाठी रमाई आवास, शबरी त्याही पलीकडे सर्वसमावेशक पंतप्रधान आवास योजना अश्या शासनाच्या जन कल्याणकारी योजना कार्यान्वित असताना त्या आवास योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहचू शकत नाही कुठेतरी माशी शिंकावी अशी अवस्था निर्माण होत असताना शासनाच्या जनकल्याणकारी योजनाचे काय तर गरीब गरजुना डावलून श्रीमंतांच्या माहाल माळया उभ्या आल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरकुलाच्या लाभापासुन अनेक जनता वंचित आल्याचे दिसून येत आहे . एकीकडे घरकुल मिळत नाही तर दुसरीकडे घरकुलाचा हप्ता मिळन्यासाठी कार्यलयात हेलपाठ्या मारण्या पलीकडे कसरत करावी लागते. तालुक्याच्या ग्रामीण भागासह मुख्यालयाची घरकुला बाबत मोठी समस्या निर्माण होत असताना आजही अनेक गरीब जनता घरकुला पासून वंचित राहण्याची वेळ निर्माण होत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असताना निवाऱ्या विना जीवन व्यतीत करण्याची वेळ निर्माण झाल्याने शासनाच्या जनकल्याणकारी योजनेचा फायदा काय या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. 

सावलीला नप चा दर्जा प्राप्त झाल्या नंतर सर्वच योजना गुंडाळल्या गेल्या 2021 पर्यन्त सर्वाना हक्काचे घर मिळावे म्हणून सर्व समावेशक पंतप्रधान आवास योजना नप स्तरावर राबविली गेली. निवाऱ्या ची व्यवस्था होईल या आशेवर आनेकानी कागद पत्राच्या जळवा जुळवी साठी हजारो रुपये देउन सर्व फाइल नपच्या संबंधित विभागाला देऊन पाच वर्षाचा कालावधी लोटूनही सर्व समावेशक पंतप्रधान आवास योजनेचा लाभ गरीब गरजुंना मिळू शकला नाही. कागद पत्राच्या जुळवाजुळवी साठी केलेला खर्च वाया गेल्याची बोम्ब सुरु असून हजारो फाईल शासन दरबारी धूळ खात पडल्या आहेत. शासना कडून निधी उपलब्ध नाही असे स्थानिक प्रशासनाकडुन सांगितले जात असल्याने घरकुल मिळन्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न भंगले असून आजही नगरातील जनता घरकुल योजने पासुन वंचित असल्याने सावली नप अंतर्गत  सर्व समावेशक पंतप्रधान आवास घरकुल योजना सपशेल फेल झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी गरीब आणि गरजुना घरकुल योजने पासून वंचित राहावे लागत असून स्थानिक प्रशासनाच्या अश्या धिसाळ आणि नियोजन शून्य कार्यभाळामुळे घरकुल योजनेचा फ़ज्जा होत असून गरीबाचे घरकुल मिळण्याचे स्वप्न भंगल्या जात आहे. 




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top