Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलीच्या खाजगी कंपनीत मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कंपनीत मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर मृत युवकाच्या कुटुंबियांना मदत जाहीर कुटुंबातील एकाला नोकरीसह आर्थिक मदत देण्याचे कंपनीचे लेखी आश्वासन वेको...

  • कंपनीत मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर
  • मृत युवकाच्या कुटुंबियांना मदत जाहीर
  • कुटुंबातील एकाला नोकरीसह आर्थिक मदत देण्याचे कंपनीचे लेखी आश्वासन
  • वेकोलि कंत्राटी कामगार युवकाच्या बुडीत मृत्यु प्रकरणात कुटुंबियांना मिळाला मोठा दिलासा
  • मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात अली होती मदतीची मागणी
  • वाचा सविस्तर......

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
पोवनी-३ कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या खाजगी कंपनीत मुन्ना कंत्राटदाराकडे कामावर असलेल्या विशाल गणपत हंसकर वय १९ राहणार वरोडा यांचा ३ एप्रिल ला कामावर असतांना सायंकाळी ४ वाजता पंप सुरु करण्यासाठी पाण्यात उतरला असता बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.

बल्लारपूर वेकोली क्षेत्रांतर्गत येत असलेल्या पोवनी-३ या कोळसा खाणीत खाजगी कंपन्यांचा भरणा असून या ठिकाणी खाजगी कंपनीचे कोळसा काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे, मुन्ना कंत्राटदाराकडे वरोडा येथील विशाल हंसकर दिवस पाळीत काम करीत असताना पाण्यातील मोटार पंपचा पाईप जोडण्यासाठी गेला असता खोल पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला.

खाजगी कंपनीत मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याने नेहमी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येत असतो, आज झालेल्या घटनेत सुद्धा सुरक्षा नसल्याने मजुरांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे.

पोवनी-३ या कोळसा खाणीकरीता अधिग्रहीत केलेल्या साखरी, पोवनी, वरोडा, चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या परंतु अजूनपर्यंत नोकऱ्या मिळाल्या नाही मात्र कोळसा उत्पादन सुरू आहे. वेकोलीच्या मनमानी कारभाराला अनेक प्रकल्पग्रस्त बळी पडत असून चार दिवसांपूर्वी वेकोलीच्या नियोजन अधिकारी यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे वीस वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे. स्थानिक बेरोजागांना रोजगार देण्यासाठी टाळाटाळ करीत असून त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने विशाल हंसकर यांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मदतीची मागणी केली होती. 

विशालच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कामगारांत असंतोष निर्माण झाला होता तसेच लगतच्या साखरी गावातील नागरिकही संतप्त झाले होते. मयत विशालचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी तसेच कामगारांनी कुटुंबाला आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एकाला नोकरी दिल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही अशी भुमिका घेऊन शव वाहिकेला घेराव घातला होता.

नागरिक तसेच संतप्त कामगारांच्या रोषाची अखेर दखल घेत वेकोलिच्या पोवणी २ उपक्षेत्राचे उपक्षेत्रीय प्रबंधक एकांबरम ह्यांनी मृताच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी तत्काळ एक लाख रुपये रोख देण्याचे जाहिर केले तसेच लेखी आश्वासनात मृताच्या परिवारातील एका सदस्याला जीआरएन कंपनी मधे नोकरी तसेच पुन्हा 50 हजार रुपये रोख सानुग्रह अनुदान त्याचबरोबर एक्स ग्रेसीया १५ लाख रुपये रोख, तसेच शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर वर्कमॅन कंपेनसेशन अ‍ॅक्ट नुसार १६ लाख रुपये ३ दिवसांच्या आत असे एकुण ३२,५०,००० मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगार तसेच नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. ह्यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनावर पोवणी २ उपक्षेत्राचे उपक्षेत्रीय प्रबंधक एकांबरम यांची व साक्षीदार म्हणुन बबन उरकुडे, सचिन गोरे, संदिप वैरागडे, खुशाब पोडे, अमोल घटे ह्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top