Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आताची मोठी बातमी.... ब्रेकिंग न्यूज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्ह्यात 21 एप्रिल पासून ‘जनता कर्फ्यू' अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फळे, सर्व प्रक...

  • चंद्रपूर जिल्ह्यात 21 एप्रिल पासून ‘जनता कर्फ्यू'
  • अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन
    सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना/दुकाने उपरोक्त कालावधीत बंद
  • काय राहणार सुरु, काय बंद वाचा सविस्तर.....

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्हयांतर्गत सर्व व्यापारी संघ, स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधी यांच्या सूचना व सहमतीने चंद्रपूर जिल्हयांतर्गत दैनंदिन वाढत असलेले कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर प्रतिबंध करणे व कोरोना रोगाची साखळी खंडीत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी कमी करणे याकरीता दिनांक 21 एप्रिल 2021 ते दिनांक 25 एप्रिल 2021 व दिनांक 28 एप्रिल 2021 ते दिनांक 01 मे, 2021 या कालावधीत स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे दि. 18 एप्रिल 2021 ला झालेल्या सभेत ठरविण्यात आलेले आहे. त्या नुसार जनता कर्फ्यू दरम्यान खालीलप्रमाणे सेवा सुरु राहतील असे आवाहन करण्यात येत आहे :

1. दिनांक 21 एप्रिल, 2021 ते दिनांक 25 एप्रिल, 2021 व दिनांक 28 एप्रिल 2021 दिनांक 01 मे, 2021 या कालावधीत खालील सेवा नियमितपणे सुरु राहतील : अ) सर्व दवाखाने व औषधी दुकाने, कृषी केंद्र व पशु खाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालय, बँक,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत औद्योगिक आस्थापना कार्यालयीन दिवशी), ब) घरपोच सेवासह दूध वितरण, वर्तमान पत्र, एल.पी.जी. गॅस वितरण, पेट्रोल पंप व हॉटेल मधुन Delivery Boy व्दारे घरपोच सेवा सुरु राहील.

क) परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांचेसोबत त्यांचे पालक यांना परवानगी राहील. सोबत प्रवेशपत्र बाळगावे.

2. दिनांक 21 एप्रिल, 2021 ते दिनांक 25 एप्रिल 2021 व दिनांक 28 एप्रिल, 2021 ते दिनांक 01 मे, 2021 या कालावधीत वरीलप्रमाणे सेवा सुरु राहतील. त्या व्यतिरिक्त सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना/दुकाने उपरोक्त कालावधीत बंद राहतील.

उपरोक्त कालावधीत वरील क्रमांक मधील सुविधा सोडून चंद्रपूर जिल्हयातील सर्व पानठेला/चहा टपरी व हातगाडी, फुटपाथ वरील चायनीजसह इतर सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना बंद राहतील. वरीलप्रमाणे कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरीक / लोक प्रतिनीधी व इतर सर्व दुकानदार यांनी स्वयंघोषीत जनता कर्फ्यू पाळून नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top