Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माणूस जगला तर सर्व काही करू शकेल - जिप सदस्य गजानन बुटके
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माणुसकी जोपासत कोरोना रुग्णांना करीत आहे सहकार्य मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चिमुर - एकीकडे कोरोनाचा थैमान सुरु आहे तर दुसरीकडे कोरो...

  • माणुसकी जोपासत कोरोना रुग्णांना करीत आहे सहकार्य
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चिमुर -
एकीकडे कोरोनाचा थैमान सुरु आहे तर दुसरीकडे कोरोना मृत्यू तांडव करीत आहे. अश्यातच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाहना द्वारे व्यवस्था करून रुग्णालयात उपचारासाठी लक्ष घालून मदतीचा हात जिप सदस्य गजानन बुटके करीत आहे. माणूस जगला तर सर्व काही करू शकेल अशी प्रतिक्रिया देत त्यांनी पक्ष भेद विसरून मानवतावादी धर्म पाळत कोरोना बाधितांना मृत्यूच्या दारातून वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुद्धा आवाहन केले. 

टेकेपार येथील एका कोरोना बाधिताचा ऑक्सीजन लेव्हल खूप कमी असताना पूर्ण धावपळ करून त्या बाधितास सध्या ७८ ऑक्सिजन झाल्याची माहिती सांगत त्या बाधितास मृत्यूच्या दारेतून बाहेर काढून जीवनदान मिळाले आहे. 

कोविड सेंटर मध्ये व उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाना मदतीसाठी उमेश हिंगे व राकेश साठोने अहोरात्र परिश्रम घेत आहे अशी माहिती सुद्धा जिप सदस्य गजानन बुटके यांनी सांगत येणाऱ्या दिवसात नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सतत मास्क चा वापर करून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top