- ठाकरे सरकारने केली घोषणा ; सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणार
मुंबई -
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे. राज्यातील वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान सरकारकडून कठोर निर्बंधही लादले जात आहेत. यासोबतच लसीकरण मोहिमेवरही ठाकरे सरकारने लक्ष केंदीत केले आहे. 1 मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. यानंतर आता रविवारी राज्य सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.
सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणार
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची घोषणा केली आहे. 'महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार आहे. सरकार आपल्या तिजोरीमधून हा कार्यक्रम हातात घेणार आहे. जागतिक टेंडर मागवण्यात येईल आणि जास्तीत जास्त लस खरेदी केल्या जातील. कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली आणि एकमत झाल्यानंतर राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला होकार दिला आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे' असेही मलिक म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.