Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भद्रावती शहरातील हनुमान नगर परिसरात आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागरिकांच्या सावधगीरीने अनर्थ टळला आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी भद्रावती - भद्रावती शहरातील हनुमान नगर परिसरातील मागच्या बाजूला मोकळ्या मै...

  • नागरिकांच्या सावधगीरीने अनर्थ टळला
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
भद्रावती -
भद्रावती शहरातील हनुमान नगर परिसरातील मागच्या बाजूला मोकळ्या मैदानातील झाडेझुडपांना तथा गवताला आग लागल्याची घटना दि.१८ ला दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली.

मात्र येथील नागरिकांनी प्रसंगावधानता दाखवत एकत्र येऊन ही आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.या घटनेची माहिती भद्रावती नगर परिषदेला देण्यात आल्यानंतर नगर परिषदेचे अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी पोहचले. त्याआधीच नागरिकांनी जवळपास संपूर्ण आगीवर ताबा मिळविला होता. अग्निशमन दलाने नंतर ही आग पूर्णपणे विझविली.सदर आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. हनुमान नगरच्या मागे झाडेझुडपे असलेले मोकळे मैदान आहे. या नगरातील मागच्या भागातील घरांच्या अगदी जवळ ही आग लागून पाहतापाहता पसरली मात्र नागरिकांनी वेळीच सावधपणा दाखवीत आगीवर नियंत्रन मिळविले. या आगीत झाडेझुडपे व गवत वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नाही. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top