- तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवक व त्याच्या भावाविरुद्ध दाखल केला गुन्हा
पीडित तरुणी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. एक महिन्यापूर्वी तिची फेसबुकवर विक्रम याच्यासोबत ओळख झाली. विक्रमने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. लग्नाचे वचन दिले. ३० मार्चला दुपारी तो नागपुरात आला. त्याने विद्यार्थिनीला भेटायला म्हाळगीनगर चौकात बोलाविले. विद्यार्थिनी त्याला भेटायला गेली. यावेळी अतुलही विक्रम याच्यासोबत होता. नातेवाइकांना तुझी भेट घालून देतो, असे म्हणून तो तिला घेऊन मोटारसायकलने तिरोडा येथे गेला. तेथे अतुल याच्या घरी नेले. त्याच्या आई-वडिलांशी भेट घालून दिली. त्यानंतर तो तिला घेऊन लॉजवर गेला. आता आपले लग्न होणार असल्याने त्याने तिला शारीरिक सुखाची मागणी केली. विद्यार्थिनीने नकार दिला. त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. सतत तीन दिवस त्याने लॉजमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार केला. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. ती आढळून आली नाही. नातेवाइकाने हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची नोंद केली. तीन दिवसानंतर विक्रम याने तरुणीला म्हाळगीनगर चौकात आणून सोडले. ती घरी गेली.आई-वडिलांनी तिला विचारणा केली. विक्रम याने लग्न करणार असल्याचे सांगून नातेवाइकांच्या भेटीसाठी नेल्याचे तिने सांगितले. वडिलांनी मुलीसह हुडकेश्वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून विक्रम याचा शोध सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.