Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रत्येक घरावर भाजपचा झेंडा लावून स्थापना दिवस साधेपणाने साजरा करावा - आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम साजरे न करण्याचे आवाहन मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - को...

  • कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम साजरे न करण्याचे आवाहन

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे तसेच राज्‍यात कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता राज्‍य शासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहे. यात प्रामुख्‍याने जमावबंदी लागु करण्‍यात आली आहे. या पार्श्‍वभुमीवर दि. 6 एप्रील रोजी साजरा होणारा भारतीय जनता पार्टीचा स्‍थापना दिवस भाजपा पदाधिकारी व कार्यकत्‍यांनी अतिशय साधेपणाने साजरा करावा असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

दि. 6 एप्रील रोजी भाजपाचा स्‍थापना दिवस साजरा करताना कोणतेही गर्दी निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करू नये. आपल्‍या घरासह भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणा-या प्रत्‍येक नागरिकाच्‍या घरावर भाजपाचा झेंडा लावावा व शुभेच्‍छा दयाव्‍या असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

मुख्‍यमंत्र्यांनी कठोर निर्बंध तसेच शनिवार व रविवारी लॉकडाउन जाहीर करताना विरोधी पक्षाने सुध्‍दा सहकार्याचे आवाहन केले होते. त्‍या आवाहनाला पाठिंबा देत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top