Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अखेर श्रुती थाटे मृत्यु प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रहारच्या मागणीला यश आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स अडेगांव - अडेगाव येथील ११ वर्षीय मुलगी श्रुती किशोर थाटे २६ फेब्रुवारी रोजी विजेचा जिवं...

  • प्रहारच्या मागणीला यश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
अडेगांव -
अडेगाव येथील ११ वर्षीय मुलगी श्रुती किशोर थाटे २६ फेब्रुवारी रोजी विजेचा जिवंत ताराचा स्पर्श होऊन मृत्यु झाला होता. त्या प्रकरणी निष्पाप मुलीच्या मृत्युसाठी जबाबदार आरोपीस गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिकेत चामाटे आणी नितीन गोरे यांनी केली होती. त्या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी तपास अंती ३१ मार्चला सायंकाळी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपीला कलम ३०४, २०१ अन्वये अटक करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिकेत चामाटे, नितीन गोरे यांनी अडेगाव येथील श्रुती किशोर थाटे या निष्पाप मुलीच्या बळी गेलेल्या कुटंबाची भेट घेतली. कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर थेट पोलिस स्टेशन गाठून प्रकरणाची सखोल चौकशी केली. आरोपींच्या विरोधात कुठलीच तक्रार दाखल नसल्यामुळे मुलीच्या कुटुंबाच्या मागणीनुसार आरोपीं विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यायची मागणी करण्यात आली होती. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top