Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पाण्यासाठी पायपीट ; ४ किमीवरून आणावे लागत आहे पिण्याचे पाणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जल शुद्धीकरण संयंत्र मागील एक वर्षापासून बंद शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - कोरपना तालुक्यात सध्या उन्हाळ्याच्या झळा ...

  • जल शुद्धीकरण संयंत्र मागील एक वर्षापासून बंद

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यात सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या असून, हंडाभर पाण्यासाठीही जीवाचे रान करावे लागत आहे. विशेषतः तालुक्याच्या अनेक भागांत पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. मौजा पालगांव येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे पालगांव या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी येथील माइन्स गेट वरुन ४ किमी अंतर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. गावातील पाणी हे पिण्यायोग्य नाही. आणी, येथील ग्रामपंचायती ने लावलेला जल शुद्धीकरण संयंत्र मागील एक वर्षापासून बंद असल्यामुळे नळाला पाणी येत नाही आहे. ग्रामपंचायती मध्ये वारंवार तक्रारी करुन सुद्धा ग्रामपंचायत व तत्सम कार्यालयाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आता तहसिलदार साहेबानी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे. एका आठवड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली न काढल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशारा गावातील संतप्त महिलांनी दिला आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top