Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कंत्राटी कामगाराच्‍या डेरा आंदोलनाला भाजपाचा पाठींबा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथील ५०० कंत्राटी कामगार कुटुंबासह डेरा आंदो...


मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -

शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथील ५०० कंत्राटी कामगार कुटुंबासह डेरा आंदोलनासाठी बसले आहेत. या कंत्राटी कामगारांना कोरोना काळातील कामाचे वेतन न दिल्‍यामुळे हे आंदोलन चालु आहे. हे कामगार कोरोना योध्‍दा आहेत मात्र् त्‍यांचे वेतन न देता त्‍यांचे शोषण सुरू आहे. त्‍यांचे थकीत वेतन त्‍वरीत देण्‍यात यावे, अशी मागणी करत भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेने या आंदोलनाला पाठींबा जाहीर केलेला आहे.

भाजपाचे चंद्रपूर जिल्‍हा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवाणी, सुभाष कासनगोट्टुवार, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, पंकज अग्रवाल, धम्‍मप्रकाश भस्‍मे, रू्द्रनारायण तिवारी, चंदन पाल, रामकुमार आकापल्‍लीवार यांनी या आंदोलनाचे प्रणेते नगरसेवक पप्‍पु देशमुख यांना पाठींब्‍याचे पत्र् सादर केले. सदर कंत्राटी कामगारांच्‍या थकीत वेतनाबाबत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात विनीयोजन विधेयकावरील चर्चेदरम्‍यान शासनाचे लक्ष वेधले. मात्र् संवेदनाहीन शासनाने याकडे सातत्‍याने दुर्लक्ष केल्‍याचे डॉ. मंगेश गुलवाडे म्‍हणाले. या आंदोलनाला भाजपाचा पुर्ण पाठींबा असल्‍याचे महापौर सौ. कंचर्लावार म्‍हणाल्‍या. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top